";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- आमदार सुनील शेळके

आमदार सुनील शेळके

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

आमदार सुनील शेळके

तळेगाव दाभाडे, दि. 25 : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मावळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील (अण्णा) शेळके यांनी प्रचं

मताधिक्याने विजयश्री संपादन केली. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व महाराष्ट्राचे विद्यमान कामगार व पुनर्वसन राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा 93,942 मतांनी पराभव केला.

विधानसभेसाठी मावळातून एकूण 3 लक्ष 48 हजार 462 मतदार होते. त्यापैकी 2 लक्ष 47 हजार 961 जणांनी मतदान केले. त्यामध्ये सुनील शेळके यांना 1 लाख 67 हजार 712 मते मिळाली, तर बाळा भेगडे यांन 73 हजार 770 मते मिळाली. विजयी झालेले आमदार सुनील शेळके हे तळेगाव नगर परिषदेत भाजपतर्फ नगरसेवक म्हणून निवडून आले

त्यांनी उपनगराध्यक्षपदही भूषविले. मावळ तालुक्यात गेल्या 5 वर्षात त्यांनी स्वखर्चाने अनेक विकास कामे करून दाखविली. तालुक्यात वेळोवेळी अनेक प्रकारचे मेळावे घेतले व त्याला लोकांनी प्रचंड प्रतिसादही दिला होता. जनमानसातील उज्ज्वल प्रतिमा पाहता या खेपेस पक्षाने आपणास तिकिट द्यावे असा त्यांचा आग्रह होता. परंतु पक्षाने त्यांची मागणी विचारात न घेता बाळा भेगडे यांना तिसर्‍यांदा उमेदवारी दिली. त्यामुळे सुनील शेळके यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला व त्यांना तिकिटही मिळाले. मध्यंतरी काही काँग्रेसच्या नेत्यांनी मावळात आमदारकीसाठी सारखा भेगडे यांचाच विचार का

होतो असा मुद्दा मांडला होता, तर काही काँग्रेस नेते व राष्ट्रवादीचे नेतेही गेली 25 वर्षे मावळात असलेली भाजपची मक्तेदारी मोडून काढली पाहिजे असा विचार पुढे आणत होते. या दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रम व सुनील शेळके यांचे वैयक्तिक काम यामुळेच ही विजयश्री त्यांना प्राप्त झाली. 1995 साली काँग्रेसचे

मदन बाफना यांचा पराभव करून भाजपच्या रूपलेखा ढोरे निवडून आल्या होत्या. तेव्हापासून आजपर्यंत मावळात भाजपचाच आमदार निवडून येत होता. आता 25 वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. त्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले असून मावळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते यांना धन्यवाद दिले आहेत.

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 29

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds