";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कविता वाचनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न

कविता वाचनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

तळेगाव दाभाडे, दि. 9 : शेजार ज्येष्ठ नागरिक संघ, तळेगाव स्टेशन येथे कविता वाचनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. त्यात कवींनी आपल्या कविता सादर करून रसिकांचे मनोरंजन केले. सतीश साठे यांनी भारतीय पुढारी’, ‘कारखाना’, ‘अवसेच्या रात्रीअसन कसं नगरही जोडाक्षरविरहित कविता सादर केली. सुरेश अत्रे यांनी सांज येई अंधारूनीही निवृत्तिपर, ‘देवाशपथ खरं सांगतेही कवी पत्नीची व्यथा मांडणारी व शेतकरी बांधवाची व्यथा सांगणारी कविता सादर केली.

अरविंद सोवनी यांनी समर्पण’, ‘हल्ली नको वाटते नव्या ओळखी होताना’, ‘अजून मजला हसता येतेया कविता सादर करून रसिकांना हसविले. तर ती माळ मी हाती कधीच धरली नाहीया कवितेने अंतर्मुख केले. श्रीकृष्ण पुरंदरे यांनी राजकीय रंगतदार कवितावाचन उपहासात्मक आरती सादर करून चांगलेच मनोरंजन केले. जयवंत पवार यांनी जाताना मुलाखतीला’, ‘भांडण’, ‘नेता मीह्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर ठकार यांनी केले. श्रीकृष्ण मुळे यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी व विलास रानडे यांनी कवींचा सत्कार केला. इंदोरी, दि. 9 : सरस्वती विद्या मंदिर, इंदोरी या शाळेत बालदिनानिमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन मुख्याध्यापिका सौ. नीता दहितुले यांनी दीप प्रज्वलनाने केले. सर्व प्रकारच्या स्पर्धेत प्रथम व द्वितीय येणार्‍या विद्यार्थ्यांना मॅजिक बसचे वाय. एम. ऋतुजा कचवे आणि अजय बधाले यांनी प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन खाऊवाटप केले. वाय. एम.च्या कार्यकर्त्यांचे नवनाथ गाढवे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 25

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds