";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- जिद्दीने शिक्षण पूर्ण करून कर्तृत्व सिद्ध करा - आ. सुनील शेळके

जिद्दीने शिक्षण पूर्ण करून कर्तृत्व सिद्ध करा - आ. सुनील शेळके

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

तळेगाव दाभाडे, दि. 2 : आजचे युग स्पर्धेचे आहे. समोर आव्हाने उभी आहेत. मोठ्या प्रयत्नाने करियर घडवावे लागेल. अनुभवाने मोठे असणार्‍यांचे मार्गदर्शन त्यामध्ये उपयोगी पडते. जिद्द, कष्ट यांच्या जोरावर शिक्षण पूर्ण करून स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करावे, असे आवाहन आ. सुनील शेळके यांनी आदर्श विद्या मंदिरच्या वार्षिक स्नेहसेंलनप्रसंगी केले. या प्रसंगी व्यासपीठावर यादवेंद्र खळदे, सुरेश साखवळकर, सौ. वैशाली दाभाडे, अमोल शेटे, प्रा. वसंत पवार, डॉ. श्रीहरी मिसाळ, प्राचार्य संजय देवकर, प्रकाश शिंदे, सुनिता संभूस उपस्थित होते. या वेळी सुरेश साखवळकर म्हणाले की, चांगल्या माणसांच्या सहवासात राहावे म्हणजे चांगले विचार सुचतात. गुणवत्ता वाढवावी. व्यक्तिमत्त्व फुलवावे व कर्तृत्व गाजवावे. भरपूर अभ्यास करावा, परंतु त्याचबरोबर भरपूर खेळावेसुद्धा. यादवेंद्र खळदे बोलत असून व्यासपीठावर (उजवीकडून) सौ. वैशाली दाभाडे, सुरेश साखवळकर, सुनील शेळके, अमोल शेटे, वसंत पवार, डॉ. श्रीहरी मिसाळ

कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवेंद्र खळदे म्हणाले की, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संस्थेने उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा, मोठे व्हावे, यशवंत व्हावे, कीर्तिवंत व्हावे. सुरुवातीस रांगोळी दालन, विज्ञान दालन व माहिती-तंत्रज्ञान दालनाची उद्घाटने मान्यवरांच्या हस्ते झाली. ज्ञानज्योतहस्तलिखिताचे प्रकाशनही करण्यात आले. प्रा. वसंत पवार यांनी संस्थेच्या 27 वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला. प्रकाश शिंदे यांनी वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली. सौ. वैशाली दाभाडे व अमोल शेटे यांनी विचार व्यक्त केले. यशवंत, गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. किसन पाटील सौ. प्रतीक्षा ढवळे, सौ. सुजाता डावखरे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रकाश शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले. शिक्षक, सेवक या सर्वांनी परिश्रम घेतले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 17

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds