";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- निवडणूक आयोग व जनगणना यंत्रणेने एकत्र येऊन काम करावे

निवडणूक आयोग व जनगणना यंत्रणेने एकत्र येऊन काम करावे

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

निवडणूक आयोग व जनगणना यंत्रणेने एकत्र येऊन काम करावे

तळेगाव दाभाडे (स्टेशन), दि. 13 : देशात लवकरच जनगणना सुरू होणार आहे. हे काम योग्य व बिनचूक व्हावे या दृष्टीने कुटुंबातील मतदारांची नावे, जन्म दिनांक, आधारकार्ड नंबर, मतदारकार्ड नंबर व फोटो याबाबतची माहिती वेगळ्या र्फॉवर नोंदवून त्यावर सही घेतल्यास पुन्हा अन्यत्र मतदार यादीत ही नावे येणार नाहीत. या कामात गोपनीयता बाळगावी लागेल, अशी विनंती माजी नगराध्यक्ष व शेजार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांनी केली आहे. भारत सरकारच्या निवडणूक आयुक्तांना 12 मार्च 2020 रोजी लिहिलेल्या पत्रात मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या संदर्भात त्यांनी ही सूचना केली आहे.

एका मतदाराचे नाव अनेक याद्यांध्ये असणे, मयतांची नावेतशीच राहणे, नव्या मतदारांची नावे गळणे अशा अनेक उणिवा दूर करून अचूक, अद्ययावत मतदार यादी तयार होणे आवश्यक आहे. दरवर्षी जानेवारीत नवीन मतदारांची नोंद करण्याची व्यवस्थाही आवश्यक आहे. दर 10 वर्षांनी मतदार कार्ड अद्ययावत होणे हेही गरजेचे असून ते आधारकार्डाशी जोडायलाही हवे. निवडणूक आयोग व जनगणना खात्याने एकत्र येऊन काम केल्यास देशात मतदार याद्या अचूक अद्ययावतव तक्राररहित अशा बनू शकतील असे उमाकांत कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 15

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds